बीड : भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया परळी तालुक्याच्या वतीने कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे सभागृह महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे शहीद भगत सिंग यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. विशाल देशमुख , श्रीनिवास पांचाळ यांनी शहीद भगत सिंग च्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
यावेळी DYFI चे विशाल देशमुख, SFI चे तालुकाध्यक्ष अंकुश कोकाटे, जिल्हा कमिटी सदस्य व अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अशोक शेरकर, अविष्कार देवणे, गणेश दराडे, अभिषेक घटूल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.