Ram Naik on Govinda : अभिनेता गोविंदा याने नुकताच शिवसेना (शिंदे गटात) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र आता गोविंदा चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गोविंदाने २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती, ही निवडणूक त्याने काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. आता या निवडणूकीच्या बाबतीत गोविंदावर गंभीर आरोप करण्यात आले आहे.
अभिनेता गोविंदा (Govinda) याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राम नाईक यांनी गोविंदावर जोरदार हल्ला चढवला आहे. गोविंदाने २००४ ची निवडणूक लढण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मदत घेतल्याचा आरोप केला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी गोविंदाने दाऊदचा पैसा वापरला असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोके दुखी वाढली आहे.
तब्बल पाच वेळा खासदार राहिलेले भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा २००४ मध्ये पराभव करण्यासाठी भीतीच वातावरण निर्माण करण्यात आलं असा आरोप सुद्धा राम नाईक यांनी गोविंदावर केला. राम नाईक यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये गोविंदा वर हे आरोप केले आहेत. राम नाईक यांनी आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर आजही ते ठाम असल्याचे म्हटले आहे.
राम नाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर आजही ठाम आहे. माझ्या आरोपांवर आता पर्यंत गोविंदाने एकदाही स्पष्टीकरण दिलेलं नाही. याचा अर्थ मी काय समजायचा? असे म्हणत जर गोविंदाला लोकसभेची उमेदवारी दिली गेली, तर त्यावेळी मी बोलेन. असं नाईक म्हणाले.
दरम्यान, गोविंदा हा शिवसेनेकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे.


हे ही वाचा :
CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा
मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर
ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध