पुणे : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.
विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.
हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले.
स्मारकासाठीच्या सभोवतालच्या जागेचे भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्यादृष्टीने गतीने काम करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा (Savitribai Phule)
सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. हे स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले आहेत.
या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरु यांना मोबदला यासाठी भूमिसंपादनाची आवश्यक तेवढी रकमेची मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ
मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल
ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा
सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय