Thursday, May 2, 2024
HomeNewsखुशखबर : या दिवशी मिळणार चित्रपटाचे तिकीट 75 रुपयात !

खुशखबर : या दिवशी मिळणार चित्रपटाचे तिकीट 75 रुपयात !

पुणे : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशामुळे १६ सप्टेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सिनेमा दिवस (National Cinema Day) २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार होता. या दिवशी अनेक मल्टिप्लेक्स चेन प्रेक्षकांना ७५ रुपयांचे तिकीट ऑफर करतील असे सांगितले जात होते. परंतु, आता हा दिवस पुढे ढकलत मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने निवेदन जारी केले आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना लिहिले की, अनेक भागधारकांची विनंती लक्षात घेऊन राष्ट्रीय चित्रपट दिन पुढे ढकलण्यात आला आहे. अधिकाधिक मल्टिप्लेक्स साखळींनी यात सहभागी व्हावे, यासंदर्भातील गोष्टीही ठरल्या आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये गर्दी परतली आहे. २०२२ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चांगले राहिले नाही. फक्त गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाईल्स आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला. मोठ्या अभिनेत्यांचेही चित्रपट चालले नाही.

नुकताच ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाला आहे. यामुळे चित्रपट मालकांना कमाई करायची आहे. ब्रह्मास्त्र प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात १४३ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर परदेशात ६५ कोटींची कमाई केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय