नवी दिल्ली : तापमान वाढीचा (अल-निनोचा) प्रभाव कमकुवत होत असून पावसावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. गेल्या काही वर्षांत अल निनोमुळे हिंद महासागर, पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे आणि एकूण जागतिक तापमान वाढले होते, परिणामी २०२३ मध्ये मान्सूनच्या ऋतुचक्र बदलले आणि वाऱ्याचा वेग आणि मार्ग यामध्ये बदल होऊन भारतासह आशिया खंडातील देशात चक्रीवादळे,अतिवृष्टी झाली.
भारतात त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, मात्र यावर्षी जानेवारी पासून अल निनो (El Nino) मुळे जानेवारी पासून तापमान वाढ झाली. मात्र आता अल निनो प्रभावहीन होत आहे. अशी माहिती आयएमडी ने दिली आहे.
हवामान विभागाकडे असलेल्या सुमारे ७० वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तर अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने (IMD) चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १०४-१०६ टक्के वरुण राजा बरसणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय. यावर्षी ८ जून पर्यंत मान्सून अंदमान केरळ (kerala) मार्गे भारतात दाखल होणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असणार असल्याचं म्हटलं आहे. सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली आहे.
संपूर्ण देशभर १०६ टक्के पाऊस बरसणार आहे.
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदिगड, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुड्डुचेरी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली, दमण-दीव या राज्यांसह संपूर्ण देशभर १०६ टक्के पाऊस बरसणार आहे. Mansoon news
स्कायमेट हवामान सेवा (skymate weather service) या खाजगी संस्थेने पण मान्सूनच्या (Mansoon) आगमनाची माहिती दिली आहे,
भारतीय हवामान खात्याने सुरुवातीला (जून-जुलै) मंद असेल, परंतु त्याची भरपाई दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) होईल. ८ जूनपर्यंत मान्सून भारतात दाखल होईल, मान्सून बाबतची पुढील वाटचाल किंवा माहिती मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केली जाईल, असे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे.
यामुळे कृषी क्षेत्रासह सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस पिकांसाठी चांगला असतो. देशात वर्षभर होणाऱ्या पावसापैकी ७० टक्के पाऊस हा मान्सूनच्या काळातच पडतो. देशातील ७० ते ८० टक्के शेतकरी वरुण राजाच्या कृपेमुळे सुखी होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा (agriculture) हिस्सा २० टक्के आहे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यातून रोजगार मिळतो. चांगला पाऊस पडल्यास सणासुदीपूर्वी चांगले उत्पन्न मिळू शकते.