मुंबई-दि.२७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे,महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी राज्यसभेत मातंग समाजाचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे.
मातंग जात ही भारतातील मोठ्या दलित समाजाचा भाग आहे. त्यांच्या जातीच्या स्थितीमुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक उपेक्षिततेचा सामना करावा लागत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या,ते चामड्याचे काम,शेती आणि इतर क्षुल्लक नोकऱ्या यासारख्या व्यवसायात गुंतलेले होते. कालांतराने, सामाजिक न्याय आणि समतेच्या चळवळींनी मातंग समाजाच्या सशक्तीकरण आणि उन्नतीसाठी कार्य केले आहे. मातंग जातीला भेडसावणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्या विषयक सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी साठी राज्यसभेत देशातील सकल मातंग व अन्य उपेक्षित जाती जमातीचे प्रतिनिधित्व देऊन सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडण्यासाठी मातंग समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व देण्यात यावे,अशी आमची मागणी आहे.
तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी व लोकसंख्येच्या नुसार अ ब क ड करून स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी तसेच इतर मातंग समाजाच्या मागण्या करिता व इतर मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मातंग समाजाला राज्यात राज्यसभेत प्रतिनिधीत्व असणे गरजेचे आहे.
ते न दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्या संदर्भात विचार करणार असल्याचे स्पष्ट मत लोकसेवक युवराज दाखले यांनी प्रसिद्धी निवेदन काढुन व्यक्त केले आहे