Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यघोडेगाव : कोरोना विषयक जाणीव - जागृती अभियान उपयुक्त

घोडेगाव : कोरोना विषयक जाणीव – जागृती अभियान उपयुक्त


घोडेगाव : कोरोना विषयक जाणीव – जागृती अभियान उपयुक्त ठरत आहे.शहीद राजगुरु ग्रंथालय व आदीम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन दिवसांपासून कोरोना जाणीव जागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला होता.लोकांच्या मनातील लसीकरण विषयक शंका दूर करत,कोणताही आजार अंगावर काढू नका ,त्वरित दवाखान्यात जा.असा संदेश देत सुमारे ३५ वाड्या-वस्त्यांवर जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला.

आंबेगाव तालुक्यात गावागावात सातत्याने कोविडचा प्रसार वाढत आहे.या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये कोरोना विषयक नियमांचे जाणीवजागृती होणे आवश्यक आहे,यासाठी शहीद राजगुरु ग्रंथालय व आदीम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन दिवसांपासून कोरोना जाणीव जागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला होता,तीन दिवसानंतर या अभियानाचा समारोप करण्यात आला आहे.

            

दि.२८ – ३० एप्रिल,२०२१ या तीन दिवस झालेल्या  जाणीवजागृती अभियानात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन माईक द्वारे कोरोना विषयक माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात आली,

लसीकरण करा,कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित सरकारी दवाखान्यात जावे,कोरोना विषयक योग्य ती खबरदारी घ्या असा संदेश यावेळी देण्यात आला.

या जाणिव जागृती कार्यक्रमात लोकांच्या मनातील लसीकरण विषयक प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे देऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

यावेळी कोरोना विरोधी जन अभियान च्या वतीने लसीकरण चे महत्त्व सांगणारी  १००० पुस्तिका लोकांमध्ये वितरित करण्यात आली.  

                                     

या जाणीव जागृती कार्यक्रमा दरम्यान गोहे बु,गोहे खु,राजेवाडी,पोखरी व तेथील वाड्या-वस्त्या,तळेघर,जांभोरी,राजपूर,गाडेवाडी, तेरुंगण,निगडाळे, म्हतारबाचीवाडी, सावरली,पाटण,पिंपरी, साकेरी,म्हाळुंगे, कुशिरे, भोईरवाडी, कोंढरे,तिरपाड,डोण,आगाणे,बोरघर, फुलवडे, असाणे अशा सुमारे ३५ वाड्या – वस्त्यांमध्ये जाऊन कोरोना विषयक बचावासाठी लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगण्यात आले.

                                    

दरम्यायान या  जाणीव जागृती अभियानास तहसील कार्यालय,पंचायत समिती व घोडेगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन लाभले होते.या अभियान कार्यक्रमाचे उदघाटन दि.२८ एप्रिल,२०२१  रोजी पंचायत समिती आंबेगाव येथे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार,पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता वडेकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडले होते.

या जाणीव – जागृती अभियानात आदीम संस्था व शहीद राजगुरु ग्रंथालयाचे कार्यकर्ते  अशोक पेकारी, राजू घोडे, डॉ.अमोल वाघमारे,अविनाश गवारी, दत्ता गिरंगे,लक्ष्मण मावळे, यांनी  सहभागी होऊन लोकांच्या मनातील शंका दूर होण्यासाठी प्रयत्न केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय