पुणे : घोडेगाव (Ghodegaon) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वसतिगृह आणि आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया याने आज (दि.७) रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले. प्रकल्प अधिकारी व शिष्टमंडळ यांची सात तास झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आणि शासनस्तरावरील मागण्यांबाबत उद्या (दि.८) रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयात सहकार मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थित बैठक होणार असल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासन नेहमी दुर्लक्ष करते. आदिवासी आश्रमशाळेत सेंट्रल किचन पद्धत सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही सेंट्रल किचन पद्धत कायमस्वरूपी बंद करावी. वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला पाहिजे. घोडेगाव प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी एकूण सात हजार जागा वाढविण्यात याव्यात. जिल्हास्तरावरील वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धत सुरू करावी.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांची डिग्री झाली आहे. त्यामुळे वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करून चार वर्षे वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा. आश्रमशाळा वसतिगृहामधील मूलभूत सुविधांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावे. आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मंचर येथील पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडण्यात यावा. अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश देण्यात यावे. विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती व वसतिगृहातील डीबीटी तत्काळ वितरित करण्यात यावी. इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेत अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी एसएफआयचे धरणे आंदोलन सुरू होते.
Ghodegaon
यावेळी एसएफआयचे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक वालकोळी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा सहसचिव समीर गारे, आंबेगाव तालुकाध्यक्ष रोहिदास फलके यांच्यासह माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, माजी अध्यक्ष देवराम लांडे, बाळासाहेब बाणखीले, प्रभाकर बांगर इत्यादी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा :
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन