Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडईपीएस पेन्शन धारकांचा पुण्यात गुरुवारी महामेळावा

ईपीएस पेन्शन धारकांचा पुण्यात गुरुवारी महामेळावा

जुन्नर : खाजगी व सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रकारच्या मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे येथे आंबेगाव पठार, सर्व्हे नंबर 15, चिंतामणी ज्ञानपीठ, कात्रज डेअरी जवळ, येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शेतकरी व कामगार नेते, राष्ट्रीय संघर्ष समितीचे जुन्नर तालुका अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय संघर्ष समितीचे संस्थापक/ अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या महामेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या शुभहास्ते उदघाटन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विजय रेणुसे, युवराज रेणुसे, राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार पी.एन.पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभाताई अरस, पश्चिम भारत संघटक श्री सुभाषराव पोखरकर, सरीताताई नारखेडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एस.एन.आंबेकर, देविसिंगअण्णा जाधव, समन्वयक सी.एम.देशपांडे, विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

देशातील खाजगी, सहकारी, औद्योगिक, तसेच महामंडळे क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना ईपीएस पेन्शन अंतर्गत दरमहा कमितकमी साडेसात हजार रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता, सेवानिवृत्त कर्मचार्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात आदी विविध प्रकारच्या मागण्यांसाठी कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गेली काही वर्षे सातत्याने संघर्ष करण्यात येत आहे. केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी 15 मार्च 2023 रोजी संपूर्ण देशात सुमारे 200 ठिकाणी एकाच दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

तरी या महामेळाव्याला पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली जिल्ह्यातील असंघटीत, खाजगी, सहकार,औद्योगिक, तसेच महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी केले आहे.



परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती



संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय