Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगौतमी पाटीलच्या घुंगरूचा खणखणाट झळकणार मोठ्या पडद्यावर... या तारखेला जा सिनेमागृहात

गौतमी पाटीलच्या घुंगरूचा खणखणाट झळकणार मोठ्या पडद्यावर… या तारखेला जा सिनेमागृहात

मुंबई : महाराष्ट्रभर आपल्या तालावर सगळ्यांना नाचवणारं नाव म्हणजे गौतमी पाटील. महाराष्ट्राच्या गावागावात गौतमीचं नाव गाजत आहे. लावणी क्वीन गौतमी पाटील स्टेजवर तर थिरकतेच पण आता मोठ्या पडद्यावर तिची जादू पाहायला मिळणार आहे.गौतमी आता लवकरच चित्रपट क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. गौतमी लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाचं नाव घुंगरू असं आहे. कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर नाचायला लावणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट राज्यातील १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक बाबा गायकवाड यांनी‌ आज पंढरपुरमध्ये दिली. या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या घुंगरू चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच करण्यात आले.



गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका असलेला ‘घुंगरू’चित्रपट एकाच दिवशी राज्यातील 100 चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वतः गौतमी पाटील आणि इतर कलाकार 6 डिसेंबरपासून राज्यभरात फिरणार आहेत. लोककला केंद्र, तमाशा आणि स्टेज शोमध्ये नृत्य करणाऱ्या महिला कलाकरांची पडद्यामागणी सत्य कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.



या चित्रपटाचे चित्रिकरण महाराष्ट्रासह पंजाब, केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या सहा राज्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये तयार करण्यात येणार असल्याचे माहिती देखील बाबा गायकवाड यांनी दिली आहे. बाबा गायकवाड यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा कलावंतांच्या जीवनावर आधारीत असला तरी त्यात गौतमी पाटीलची लव्ह स्टोरीही दाखवण्यात आली आहे. गौतमीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्यासह तिच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे. गौतमी पाटीलचा पहिलाच मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय