Gabriel Attal : गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित केले आहे. गॅब्रिएल अटल हे जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.
62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर गॅब्रिएल अटल यांनी त्यांची जागा घेतली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन आपल्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत असताना गॅब्रिएलची पंतप्रधान म्हणून ही नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी फ्रान्स सरकारमध्ये गॅब्रिएल अटल हे शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत होते. 34 वर्षांचे गॅब्रिएल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. सोमवारी रात्री उशीरा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एलिझाबेथ बॉर्न यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा स्वीकारला. यानंतर 62 वर्षीय एलिझाबेथ यांच्या जागी मॅक्रॉन यांनी गॅब्रिएल अटल यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.