Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे वकील आणि डॉक्टरांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी आपल्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा असे आवाहन करताना त्यांनी पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी इंदापूरमध्ये बोलताना म्हणाले, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता घ्यावा लागेल, असे विधान अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
अजित पवार यांच्या या विधानामुळे वादंग सुरू होण्याची चिन्हे आहेत. या विधानावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक्स वर लिहले आहे की, ‘अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? मलिदा गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!’
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार हे व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदाच करतील. हा देश सध्या व्यापारी चालवत आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यापाऱ्यांचे एजंट पेरले आहेत. त्यातलेच हे अजित पवार (Ajit Pawar) हे एजंट आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
तसेच, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी देखील जनतेच्या टँक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल केला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे
ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात
मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?
ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी