Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडघरकुल मध्ये मोफत दातांची तपासणी आणि उपचार शिबिर संपन्न

घरकुल मध्ये मोफत दातांची तपासणी आणि उपचार शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:दि.०५-हेल्थ विदिन रिच फाउंडेशन पुणे आणि मायक्रोसॉफ्ट न्युआन्स यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांच्या आयोजनाने घरकुल मध्ये मोफत दातांची तपासणी आणि उपचार शिबिर आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये घरकुल मध्ये नागरिकांनी चांगला सहभाग दर्शविला या शिबिरामध्ये रूट कॅनाल उपचार, दातांची पोकळी भरणे, दात काढणे, दात स्वच्छ करणे, पाॅलीस करणे, कॉस्मेटिक उपचार, लहान मुलांचे दंत चिकित्सा उपचार यावर माहिती व उपचार केले गेले. या शिवाय डॉक्टर यांनी दातांच्या निगा व स्वच्छतेबाबत माहिती दिली.

पेशंट वर उपचार केले यात डॉ.मुदस्सर शेख,महेश अरसुळ, डॉ.इसरा दलाल,डॉ.झेबा,कमल गायकवाड,अख्तर शेख यांनी शिबिर मध्ये उपचार केले.या कार्यक्रमाला ज्योती गोफणे,पप्पुशेठ हरगुडे उपस्थित राहिले.मनिषा साळवे , संतोष माळी इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

लोकप्रिय