Khaleda Zia : बांगलादेशात राजकीय उलथापालथ सुरू असून, माजी पंतप्रधान आणि प्रमुख विरोधी पक्ष नेत्या खालिदा जिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शाहबुद्दीन यांनी सोमवारी हा निर्णय घेतला.
अध्यक्ष शाहबुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय बैठकीत, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्ष बेगम खालिदा जिया (Khaleda Zia) यांना त्वरित मुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. हा निर्णय दिल्यानंतर काही तासांतच, खालिदा जिया यांची प्रमुख प्रतिस्पर्धी, माजी पंतप्रधान शेख हसीना यांना हद्दपार करण्यात आले आणि सैन्याने सत्ता ताब्यात घेतली.
सैन्यप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान, नौदल प्रमुख, वायुसेना प्रमुख आणि बीएनपीसह जमात-ए-इस्लामी पार्टीच्या इतर प्रमुख नेत्यांनीही या बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीत विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या सर्वांना मुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यापूर्वी, वाकर-उझ-झमान यांनी टेलिव्हिजनवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात शेख हसीना यांनी राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, सैन्य एक काळजीवाहू सरकार स्थापन करणार आहे, आणि हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदी खालिदा जिया यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Khaleda Zia भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास
२०१८ साली शेख हसीना यांच्या कार्यकाळात खालिदा जिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, शेख हसीना हद्दपार झाल्यानंतर तासाभरातच खालिदा जिया यांच्या मुक्ततेचे आदेश अध्यक्ष मोहम्मद शाहबुद्दीन यांनी दिले आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास