मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू नमन ओझा याच्या वडिलांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. क्रिकेटपटू नमन ओझाचे वडिल विनय ओझा यांना बँक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.
विनय ओझा यांच्यावर २०१३ साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आज मध्य प्रदेशातील मुलताई पोलिसांनी विनय ओझा यांना अटकेची कारवाई केली आहे. विनय ओझा हे दीर्घ काळापासून गायब होते.
पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम ४२० ४०९, , ४६७, ४६८, ४७१, १२० बी, ३४ आणि आयटी कलम ६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने ओझा यांना चौकशीसाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना याअगोदरच अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जौलखेडा येथील बँकेत २०१३ मध्ये अभिषेक रत्नम हे बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक असताना ओझा यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. २०१३ मध्ये ३४ बनावट खाती उघडण्यात आली आणि किसान क्रेडिट कार्ड कर्ज खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. या खात्यांच्या मदतीने १.२५ कोटी रुपये काढण्यात आले. यात काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !
ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी