Saturday, December 7, 2024
Homeक्रीडाविश्वरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा आनंदाच्या क्षणी न्हालाय. रितिकाने 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत मुलाला जन्म दिला असून, रोहित दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. या गोड बातमीने रोहितच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

रोहित शर्मा आणि रितिका 2015 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. तर डिसेंबर 2018 मध्ये त्यांची मुलगी समायराचा जन्म झाला होता. आता त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलगा आला आहे. रोहितची मुलगी समायरालाही लहान भाऊ मिळाल्याने कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे.

रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीसाठी भारतीय संघासोबत नाही. पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार असून, रोहित त्यामध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, दुसऱ्या कसोटीला तो हजेरी लावेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या आनंदाच्या क्षणी त्याचं कुटुंब नव्या सदस्याच्या स्वागतासाठी सज्ज आहे. भारतीय क्रिकेटमधील एक आघाडीचा खेळाडू आणि कर्णधार असलेल्या रोहित शर्मा याच्यासाठी हा क्षण अत्यंत खास आहे. नवीन ऊर्जा आणि उत्साहाने रोहित पुन्हा मैदानावर परतण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

रोहित शर्मा, रितिका शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला नव्या पाहुण्यासाठी अनेक शुभेच्छा.

Rohit Sharma

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय