लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. आज सकाळी ८.१६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ८२ वर्षांचे होते. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. गेल्या रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
कुस्तीपटू आणि शिक्षक असलेल्या मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री भूषवले आहे. तसेच केंद्रात संरक्षण मंत्रीपदाचा कारभार सुद्धा त्यांनी पाहिला. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना १ ऑक्टोबरच्या रात्री तब्येत बिघडल्याने आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. मुलायम सिंह यादव यांच्यावर मेदांता येथील डॉक्टरांचे एक पथक उपचार करत होते.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर कुटुंबीय त्यांच्या पार्थिवासोबत आहेत. त्यांचे पार्थिव दिल्लीहून लखनौला आणण्याची तयारी सुरू आहे. लखनऊ येथून पुन्हा इटावा येथे नेण्यात येईल.