Saturday, May 4, 2024
HomeNewsजुन्नरमधील आंबे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !

जुन्नरमधील आंबे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !

जुन्नर : रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल व विघ्नहर्ता हॉस्पिटल, आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ऑक्टोबर 202 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आंबे या ठिकाणी येथील ग्रामस्थांना एक दिवसीय हिमोग्लोबिन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील महिला व पुरुषांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना दिवाळी निमित्त भेट वस्तुचे वाटप करण्यात आले. व आंबे गावातील 20 गरीब व गरजु कुटुंबांना प्रत्येकी एक पाण्याचा हांडा त्यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित रोटरी क्लबचे मान्यवर अध्यक्ष ज्ञानेश जाधव, उपाध्यक्ष विजयकुमार आहेर, असिस्टंट गव्हर्नर ॲड. संजय टेंभे, रोटरी क्लबचे संस्थापक महाविर पोखरणा व विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. नागेश हिमगिरे, संभाजी हाडवळे, निलेश भंडारी, विमलेश गांधी, पंकज चंगेडिया, जयराम भुजबळ, अमोल निघोट, चैतन्य पोखरणा तसेच आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेंगडे, लता कीर्वे, पेसा अध्यक्ष नामदेव दांगट, कविता चिमटे, संदिप शेळकंदे, नंदु रावते, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाने आश्रम शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आभार व्यक्त करताना सरपंच मुकुंद घोडे म्हणाले, पुढील काळात अनेक विकास कामे करु. तसेच कोणतीही गरज लागल्यास रोटरी क्लब तुमच्या सोबत राहील. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय