Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कुसुरला कोजागीरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम !

जुन्नर : कुसूर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ विसावा मंदिर येथे रविवार श्री कोजागीरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती संयोजक तुकाराम महाराज दुराफे यांनी दिली

सकाळी ‘श्रीं’ची भूपाळी, श्रीं च्या मूर्तींना महाअभिषेक, श्री गायत्री मंत्र, कुबेर इंद्र व श्री दत्त स्वामी, गायत्री यज्ञ झाल्यानंतर श्री दुर्गासप्तशती पाठाचे सामुदायिक पारायण करण्यात आले. यात महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दुपारी महाआरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात असले होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री इंद्र चंद्र लक्ष्मी कुबेर पुजा व नंतर दुध प्रसादाचे वाटप करण्यात आले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles