Thursday, November 21, 2024
HomeNewsमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन

शिपाई ते लोकसभा सभापती असा राजकीय प्रवास

मुंबई:दि.२३-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते ८६ वर्षाचे होते. कालच त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनोहर जोशी याचं जन्म २ डिसेंबर १९३७ रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाले. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले.मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.
नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले.त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते शिवसैनिक झाले.आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
त्यांनी मराठी तरुणांसाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या.कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई)  मनोहरजोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई )कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट ,मुंबई अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली  तसेच कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), अशा  ४० ठिकाणी त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.
मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली,१९८० च्या दशकात मनोहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते.
मनोहर जोशी राज्याच्या राजकारणातून नंतर केंद्रात गेले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बनले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. २००६ ते २०१२ या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केलं. 
मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

संबंधित लेख

लोकप्रिय