Wednesday, May 22, 2024
Homeराष्ट्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार देशाचा अर्थसंकल्प; तुमचा खिसा कापणार की ओंजळ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार देशाचा अर्थसंकल्प; तुमचा खिसा कापणार की ओंजळ भरणार….?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा अंतरिम असणार आहे.त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचा खिसा भरणार की रिकामा होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024 News) लोकप्रिय घोषणा टाळल्या जाण्याची शक्यता आहे. तरीदेखील कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सहकार क्षेत्र यामध्ये सरकार काही महत्त्वाच्या घोषणा करणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील. त्याचप्रमाणे सरकार मध्यमवर्गीयांना प्राप्तिकतराविषयी आणखी सूट देण्यात येईल का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य लोकांसाठी न्यू इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत दिली होती.

करदात्यांना ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्यात आले होते. याशिवाय महिलांसाठी पण सरकारने विशेष घोषणा केली होती. महिलांचा बचतीचा कल पाहता, त्यांच्यासाठी खास योजना आणण्यात आली होती.त्याचबरोबर पायाभूत सोयी-सुविधांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर जवळपास १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती आणि ‘पीएम-प्रणाम’ योजना सुरु करण्यात आली होती. कृषी क्षेत्रात कर्ज वाटपाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपयांपर्यंत Finance Minister Nirmala Sitharaman will present the country’s budget today; Will it cut your pocket or fill your pocket…? आले होते. दरम्यान, या अर्थसंकल्पातही प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी नवीन असेल, अशी आशा अनेकांना आहे. त्यामुळेच संपूर्ण देशातील नागरिकांचे आजच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागून आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय