Friday, May 10, 2024
Homeग्रामीणराजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी गाईचे मूत्र शिंपडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल.

राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी गाईचे मूत्र शिंपडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल.

कोल्हापूर : शाहू समाधीस्थळी गााईचे मूत्र शिंपडणाऱ्या भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यां विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात विजय खाडे, पुष्कर श्रीखंडे, विवेक ओरा, भाजप युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी, अमित माळी, गणेश लाड, प्रसाद मोहिते, गिरीष साळुंके, विशाल शिराळकर यांच्यावर आयपीसी कलम १५३, २९५, ४९९ व ४२७ अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आला आहेत. 

सविस्तर वृत असे की, २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी नगरसेवक आदिल फरास यांच्याकडून नजर चूकीने पादत्राणे काढण्याचे विसरले. आदिल फरास यांनी चूक मान्य करत शाहू समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. 

त्यानंतर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी फरास यांनी ज्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केले, त्या ठिकाणी गाईचे मूत्र शिंपडले. या प्रकरणानंतर ऋषिकेश पाटील, अभिषेक मिठारी, सरदार पाटील, विष्णू पाटील, दिपक दळवी यांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय