Saturday, May 11, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य, विशेष लेख,आम्ही ही भारताचे नागरिक आहोत ना ? -...

जनभूमी साहित्य, विशेष लेख,आम्ही ही भारताचे नागरिक आहोत ना ? – डॉ.अमोल वाघमारे












आम्ही ही भारताचे नागरिक आहोत ना ? ? ?…

काल संपूर्ण दिवस मी शिरूर तालुक्यातील भिल्ल,आदिवासी समुदायाच्या वस्त्यांना भेटत होतो आणि सतत प्रश्न पडत होता,की जितीजागती माणसे कागदोपत्री माणस नव्हती, नव्हे ती तर ,दृश्य स्वरूपात असूनही  कायदेशीरदृष्ट्या ती अदृश्य होती.

50 वर्ष किंवा त्याही पेक्षा अधिक वर्ष ज्या जमिनीवर झोपडी करून ही मंडळी राहतात, ती झोपडी क्षणात उध्वस्त करण्याची भीती दाखवून बकासूरी आनंद घेणारी गिधाडे आणि सतत भीतीच्या छायेत राहून झोपडी वाचेल कशी यासाठी जागोजागी सरकारी कार्यालयांचे खेटे घालणारी ही अदृश्य माणसे,

त्यांचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी काल पाहताना, एक बाब सतत बोचत होती ती म्हणजे .

ही सर्व बिनचेहऱ्याची माणसे,आपण माणसं म्हणून स्वीकारणार का ?

गावातील 

शेतजमीन मालकांच्या, शेतावर, आपल्या घामातून ज्यांनी बागा फुलविल्या,सारी कष्टाची कामे करून गाव सुशोभित केला, त्यांची मात्र गावात काहीच खाणाखुण नाही.

ना रेशनकार्ड, ना आधारकार्ड,ना मतदार ओळखपत्र, ना जातीचा दाखला,ना जन्माची नोंद, ना मरणाची नोंद.

काहीच नाही, 

वाटेल तेव्हा या गावातून त्या गावात हुसकवायचे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर,जुन्नर,हवेली,दौडआणि अजूनही काही तालुक्यातील, गावातील अनेक गायरान जमिनीवर, वनजमिनिवर किंवा खाजगी जमिनीवर आपली झोपडी करून वर्षानुवर्षे राहणारा,भिल्ल आदिवासी समाज आज सरकारी कागदपत्रात कुठेच नाही,

ना जमीन,ना हक्काचे घर,दररोजच्या जगण्याची तीव्र भ्रांत, आणि मग शिक्षण कसे, कुठे आणि कधी ? ?


 सारे प्रश्नच ? प्रश्नच? ?

पण नक्कीच अंधार नाही,प्रकाशाची वाट संघटितरित्या पकडावी लागेलच .

जित्याजागत्या मानसाचे अस्तित्व नाकारताना .

तो, निर्मिक माणूस आहे,तो दमनकारी व्यवस्थेला, नमवणारा माणूस आहे हे विसरून चालणार नाही.

डॉ.अमोल वाघमारे

9405853478

पुणे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय