Friday, November 22, 2024
Homeजिल्हासहकार मंत्र्यांचा पुतळा जाळून शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळून शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

खेड : कळूस ता. खेड जि. पुणे येथे सोमवार दि.१८ सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११:३० वाजता रोजी खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासनाच्या ऊस झोनबंदी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाच्या झोनबंदी धोरणाविरोधात रयत क्रांती संघटना महाराष्ट्रभर आक्रमक झाली असून संपूर्ण राज्यभर आज सहकार मंत्र्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन सहकार विभागाने ३० एप्रिल २०२४ पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना जारी केला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.

सदाभाऊ खोत यांच्या आदेशाचे पालन करून खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून ऊस झोन बंदी विरोधात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व शासनाचा, सहकार मंत्र्यांचा, सहकार व आयुक्तांचा जाहीर निषेध केला.

या आंदोलनामध्ये खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे संयोजन रयत क्रांती संघटनचे गजानन गांडेकर, खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर, विश्वास पोटवडे, विठ्ठल आरगडे, बाळासाहेब खलाटे, भरतभाऊ आरगडे, सुनील पोटवडे, पाटीलबुवा आरगडे, सुरेश कौंटकर, परशुराम खैरे, मिनीनाथ साळुंखे, प्रा. डॉ. बाळासाहे माशेरे यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय