जुन्नर / शिवाजी लोखंडे : ई – पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे, त्यासाठी जनजागृती करुन अडचणी सोडविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महसूल विभागाचे नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !
यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, पीक पाहणी प्रक्रिया अँपद्वारे करण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. परंतु जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात अनेक वेळा नेटवर्क मिळत नाही. याचबरोबर बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ही पीक पाहणी शेतात जागेवर जाऊन करणे अडचणीचे होत आहे. तरी शासनाने या नोंदणी अँपची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन व येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपयोजना करावी.
हेही पहा ! कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज !
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, नवनाथ मोरे, सचिन मोरे, आशिष शेळकंदे उपस्थित होते.
हे वाचा ! जुन्नर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर आवटे यांची बिनविरोध निवड !