प्रतिनिधी :- नांदगाव खंडेश्वर कृषी केद्रांतील बोगस बियाण्याचा शोध घेऊन तपासणी करावी व बोगस बियाणे आढळल्यास संबधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी किसान सभेने नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी यांंच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
तसेच किसान सभेने शेतकऱ्यांना आवहान केले आहे की, बियाणे सर्दंभात कुठलीही तक्रार असल्यास किसान सभेशी संपर्क साधवा.
यावेळी शाम शिंदे, अनिल मारोटकर, दिलीप महल्ले आदी उपस्थित होते.