Thursday, May 2, 2024
Homeजिल्हानिधी उपलब्धता असताना देखील रस्ते खड्ड्यांतच...१५एप्रिलपर्यंत रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास १७ एप्रिल...

निधी उपलब्धता असताना देखील रस्ते खड्ड्यांतच…१५एप्रिलपर्यंत रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास १७ एप्रिल ला जि.प.सा.बां.च्या कार्यालयाला टाळे ठोकणार- राहुल ढेंबरे पाटील

संगमनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील साकुर पठारभागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारे १)साकुर ते बिरेवाडी फाटा(संपुर्ण खड्डेमय) रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असुन अपघातांचे प्रमाण वाढले आहे, सदर रस्त्यांवरुन प्रवास करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
१)साकुर ते बिरेवाडी फाटा, २)नांदुर खंदरमाळ ते बावपठार रस्ता ३)खंडेरायवाडी ते तास्करवाडी रोड निधी उपलब्ध आणि ४-४ नोटीस निघालेल्या असताना देखील एकाच कॉन्ट्रॅक्टर ला दिल्यामुळे या रस्त्यांची पुर्णतः वाट लागलेली बघायला मिळते.

साकुर बिरेवाडी फाटा २किमी रस्ता देखभाल दुरुस्ती अभावी खड्डेमय झालेला असुन १.४किमी रस्ता निधी उपलब्ध असताना देखील खड्ड्यातच आहे. २३जानेवारी रोजीच्या आमरण उपोषणाच्या पुर्वसंध्येवर दि.२१जानेवारी रोजी मुरुमाऐवजी रस्त्यांच्या साईडगटारांतील माती टाकुन साईड पट्ट्या बुजवण्याचे काम सुरू झाले हि बाब बिरेवाडी पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिक आणि उपोषणकर्ते राहुल ढेंबरे पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर उर्वरित साईड पट्ट्या मुरूम टाकून भरण्यात आल्या परंतु माती टाकलेल्या साईड पट्ट्यांवर माती जैसे थे, त्यानंतर दोन दिवसांनी काम बंद झाले ते आजपर्यंत सुरू झालेले नाही.
साकुर पठारभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेळोवेळी लोकशाही मार्गाने व्रुक्षलागवड आंदोलन, धरणे आंदोलन (उपरोधिक सत्कार), आमरण उपोषण वेळी दिलेल्या आश्वासन (नविन काम तसेच साकुर ते बिरेवाडी फाटा संपुर्ण रस्ता खड्डेमुक्त) जि.प.सा.बां.विभाग पुर्ण करण्यासाठी कुठलीही कार्यवाही केली नसल्याने १५एप्रिलपर्यंत संबंधित रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास सोमवार दि.१७एप्रिल२०२३ रोजी संबंधित जि.प.सा.बां.विभागाच्या कार्यालयाला साकुर पठारभागातील जनता आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष .राहुल ढेंबरे पाटील यांनी दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय