Friday, May 3, 2024
Homeराज्यआरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

आरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत शनिवारी (२५ मार्च) संपणार आहे.
या प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ६७२ अर्ज दाखल झाले आहेत.

आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही. त्यामुळे पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.

यंदा प्रवेश प्रक्रियेत ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या ७० हजारांनी वाढली आहे. अर्जांसाठी शनिवार शेवटचा दिवस असल्याने अर्जसंख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रकियेची माहिती https://rte25admission.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय