Sunday, December 8, 2024
Homeजुन्नरमहाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग व श्री राधेश्याम दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग व श्री राधेश्याम दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम 

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सुक्षशित बेरोजगार व दिव्यांग बचत गट, महीला बचत गट यांना स्वयंरोजगार सुरू करण्याचा करीता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोघ्योग पुणे व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री कालिका माता मंगळ कार्यालया कासार आळी जुन्नर येथे ग्रामीण व शहरी भागातील सुक्षशित बेरोजगारांना स्वयंरोजगार सुरू करण्याचा करीता पुणे जिल्हा ग्रामोघोग अधिकारी अमर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील कर्ज मेळाव्यामध्ये महामंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा कर्ज प्रकरण व बॅकेकडून मिळणारे कर्ज याचे मार्गदर्शन जेष्ठ सहाय्यक ऐ .ऐ .कदम यांनी मार्गदर्शन केले.

तसेच विविध नवीन व्यवसाय ची सुरूवात कशी करावी यांचे माहिती व मार्केटिंग बद्दल माहिती तसेच खनिज संपत्ती वर आधारित उद्योग, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग, पाॅलीमर व रसायनावर आधारित उद्योग, वस्त्रोद्योग, सेवा उधोग, वन संपत्ती वर आधारित उद्योग, ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग माहिती व कारागिर, बचत गट, संस्था या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली व स्क्रीनवर माहिती स्वयंरोजगार सुरू केलेल्या उद्योगांची माहिती दाखविण्यात आली.

यावेळी जुन्नर तालुक्यातील महिला बचत गट, दिव्यांग बचत गट व सुक्षशित बेरोजगार मोठया संख्येने उपस्थित होते. 273 नवीन कर्ज प्रकरण करीता नाव नोदणी झाली असून मध प्रक्षिशण करीता 34 जणांनी नाव नोदणी केली आहेे. 

यावेळी डिसेंट फाउंडेशन जुन्नर तालुका चे संस्थापक अध्यक्ष व लेण्याद्री गणपती देवस्थान चे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी उपस्थित बेरोजगारांना, महीला व दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगार सुरू करावे.  जुन्नर तालुका पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. युवक युवतींनी नोकरी च्या मागे न लागता स्वतः चा स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारांना रोजगार दयावा असे मार्गदर्शन केलेे.  तसेच तनिष्का ग्रूप जुन्नर च्या महिला अध्यक्षा उज्ज्वला शेवाळे यांनी स्वयंरोजगार उघोग सुरू करून बेरोजगारांना रोजगार दया म्हणून मार्गदर्शन केलेे. तसेच तनिष्का ग्रूप याच्या कडून नफिसा इनामदार यांना समाजातील केलेल्या कामाबद्दल प्रमाण पत्र देवून सत्कार करण्यात आला. 

तसेच जुन्नर तालुक्यातील खादी ग्रामोघ्योग चे अध्यक्ष जालिंदर ताजणे व सचिव व्ही. एन. बोडरे यांनी बॅंक कर्ज प्रकरण बाबत माहिती दिली व 5% ते 10% स्वतः चे भांडवल व 35% महामंडळ व बॅकेकडून 60% कर्ज पुरवठा दिला जात असून महामंडळाच्या कडून 35% सबसिडी तसेच विषेश घटकातील लोकांना 10 हजार ते 50 हजार रूपये सबसिडी दिली जात आहे. तरी स्वयंरोजगार सुरू करण्यास इच्छुकांनी ऑनलाईन कर्ज प्रकरण करीता नाव नोदणी करून घ्यावी म्हणून आव्हान केेले. 

श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी बॅकेत प्रकरण मंजूरकरीता येणार्या अडचणी व महीला बचत गट, दिव्यांग बचत गट लोकांनी तयार केलेल्या साहित्याची. मार्केटिंग करीता संस्था स्वतः खरेदी करून उत्पादन केलेला माल मार्केटिंग करणार असुन सर्व महीला बचत गट व दिव्यांग बचत, दिव्यांग लोकांनी स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारांना रोजगार दयावा असे दिपक चव्हाण यांनी आवाहन केले.

या वेळी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोघ्योग पुणे चे ऐ.ऐ.कदम जेष्ठ सहाय्यक, रवींद्र शेवते ऑडीटर, निवास घोलप सचिव हावेल, श्रीकांत शहा, जुन्नर तालुका डिसेंट फाउंडेशन व लेण्याद्री गणपती देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, खादी ग्रामोघ्योग जुन्नर तालुका अध्यक्ष जालिंदर ताजणे, श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, दशरथ साळवे, खादी ग्रामोघ्योग चे सचिव व्ही.एन.बोडरे, प्रभाकर पलवें, मध पर्यवेशक, जुन्नर नगर पालिका चे माजी नगरसेवक अविनाश कर्डिले, वेल्फर कादरी फाउंडेशन चे अध्यक्ष रऊफ खान पठाण, तनिष्का ग्रूप च्या उज्ज्वला शेवाळे व तनिष्का ग्रूप च्या सर्व महीला पदाधिकारी, प्रहार बेघर महिला संघटना च्या नफिसा इनामदार महीला अध्यक्षा, श्रीमती शमिम सय्यद सचिव रजनी शहा सर्व महीला पदाधिकारी सदस्य, नंदाताई खोमने, श्रीकांत जाधव राज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, श्रीहरी नायकोडी व केरभाऊ नायकोडी, सौरभ मातेले, सुनिल जंगम, अशोक घोटणे, जालिंदर ढोमसे, पत्रकार उपस्थित होते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरूण शेरकर यांनी दर गुरुवारी खादी ग्रामोद्योग चे कार्यालय सुरू असते. तसेच अधिक माहितीसाठी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप पणसुंबा पेठ जुन्नर येथे संपर्क करावा असे आवाहन केले आहे. तसेच उपस्थित मान्यवरांचे व दिव्यांग महिला बचत व सुशिक्षित बेरोजगार, उपस्थित कार्यकर्ते चे आभार मानले.

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय