Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभोसरी येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ‘उद्योजक संवाद’

भोसरी येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ‘उद्योजक संवाद’

औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांबाबत चर्चा : लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँन्ड ॲग्रीकल्चरलच्या (MCCIA) माध्यमातून भोसरी येथे पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या आणि उपाययोजना याबाबत उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम उत्साहात झाला. भोसरी येथील एमआयडीसी, टेल्को रोड, जे- ४६२ येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या (MCCIA) कार्यालयात हा ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. MCCIA च्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, महावितरणचे अधिकारी, लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, अभय भोर, सुरेश म्हेत्रे, MCCIA चे अध्यक्ष दीपक करंदीकर, मुख्य संचालक प्रशांत गिरबने, संचालक सुधानवा कोपर्डेकर यांच्यासह विविध कंपन्यांची प्रमुख प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात तीनदा बैठक घेतली. उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शास्तीकरासारखा जटील मुद्दा मार्गी लावण्यात यश मिळाले. तसेच, लघु उद्योजक संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्नही मार्गी लागला असून, आगामी काळात उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे आश्वासनही आमदार लांडगे यांनी दिले.

उद्योजक संवादात या मुद्यांवर झाली चर्चा

हजार्ड्स वेस्ट डिस्पोझल, कॉमन इफ्लुएन्ट ट्रिटमेंट प्लँट, डोमेस्टिक वेस्ट कलेक्शन फ्रॉम इंडस्ट्री, ड्रेनेज सिस्टिम इन इंडस्ट्रीअल एरिया, वेस्ट टू एनर्जी प्लँट सेट अप, सिक्युरिटी इन इंडस्ट्रिअल एरिया, लोकल बॉडी टॅक्स रिलेटेड इश्यूज., अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी केबलींग, रेड झोन रिलेटेड इश्यूज, ट्रान्स्फोटेशन ऑफ इंडस्ट्रीअल एम्प्लॉईज, स्ट्रिव्ह- ॲपरेंटिसशीप इम्प्लिमेंटेशन बाय MCCIA अशा विविध मुद्यांवर या संवाद कार्यक्रमात सकारात्मक चर्चा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्याचा पाहुणचार ; हरिनाम गजरात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे

पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान


PCMC-व्हिडीओ न्यूज : अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले हत्येचा निषेधार्थ विराट मोर्चा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय