Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाउद्योजक बालाजी पवार यांची धारूरच्या सरपंच पदी विक्रमी मताधिक्याने निवड! 

उद्योजक बालाजी पवार यांची धारूरच्या सरपंच पदी विक्रमी मताधिक्याने निवड! 

उस्मानाबाद / क्रांतिकुमार कडुलकर : मौजे धारूर ता.उस्मानाबाद येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ‘वृक्षमित्र’ पुरस्कार (महाराष्ट्र शासन) विजेते तथा महाराष्ट्र जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांचे कानिष्ठ बंधू बालाजी पवार यांचा दणदणीत 653 एव्हढ्या मताधिक्याने विजय झाला.

धारूर गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उरी बाळगून बालाजी पवार सरपंच पदाच्या शर्यतीत उतरले. त्यांचे कार्यक्षेत्र पुणे परंतु मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी बंधू अरुण पवार यांनी मेहेनत घेतली. धारूरच्या मतदार बंधू भगिनींनी पवार बंधूंच्या कार्याला भरभरून मतदान करून सहकार्य केले.

गेली कित्येक वर्षे धारूर गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलेला होता.

सरपंचपदी निवड होताच बालाजी पवार यांनी एक आठवड्यात पाणी पुरवठ्यासाठी नवीन डीपी बसवण्याच्या कामाला सुरुवात देखील केली असून राळेगणसिद्धी तसेच हिवरेबाजारच्या धर्तीवर धारूर गावचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे.

बालाजी पवार यांची सरपंचपदी निवड झाल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय