खेड तालुक्यात ५८ हजार ६८ बालकांना पोलिओचे लसीकरण
आळंदी / अर्जुन मेदनकर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत खेड तालुक्यात ५८ हजार ६८ बालकांना लस पाजण्यात आली. या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात पल्स पोलिओ मोहीमेस उत्साही प्रतिसाद मिळाला. मोठ्या उत्साहात मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांचे मार्गदर्शना खाली मोहीम राबविण्यात आली. खेड तालुका पंचायत समिती येथे पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आरोग्य विभाग, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. खेड तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६२ आरोग्य उपकेंद्र आहेत. यामध्ये एकूण ३८१ पोलिओ बूथ चे आयोजन करण्यात आले होते. पल्स पोलिओ मोहीम 3 मार्च रोजी व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. त्यानंतर ५, ६ व ७ मार्च २०२४ रोजी घरभेटी द्वारे एकूण ६० हजार पेक्षा अधिक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार असल्याचे डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत ५८ हजार ६८ बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली. यासाठी ८३ पर्यवेक्षक यांनी संनियंत्रण केले. ३८१ बुथचे नियोजन करण्यात आले होते. मोबाईल टीम १६ आणि बस स्टॅंड, टोल नाका अशा महत्वाचे ठिकाणी १० ट्रांजिट टीम तैनात केल्या होत्या. ५,६ आणि ७ मार्च रोजी घरभेटीचे माध्यमातून उर्वरित बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. भारत जरी पोलिओ मुक्त असला तरी शेजारी राष्ट्रांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो. यामुळे सर्वानी दक्षता घेण्याची गरज आहे. आपल्या बालकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री करून घेऊन पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यात या मोहिमे मध्ये विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. .
आळंदीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेत ६ हजार ८५ बालकांचे लसीकरण
राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे माध्यमातून १४ केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय येथे ६ हजार ८५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालय आळंदी मध्ये पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ वावरे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे उदघाटन करण्यात आले. आळंदी शहरात १८ पोलिओ बूथ तसेच १ मोबाईल टीम आणि १ नाईट टीम तैनात करण्यात आली आहे. माऊली मंदिरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेस उत्साही प्रतिसाद मिळाला. माऊली मंदिरात मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी शहर शिवसेनेचे प्रमुख राहुल चव्हाण, संजय घुंडरे, किरण येळवंडे यांचे हस्ते डोस देण्यात आले. गजानन महाराज मंदिर केंद्रात पल्स पोलिओ मोहीमेचे उद्धाटन माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांचे हस्ते झाले. सारडा धर्मशाळा आळंदी येथे पल्स पोलिओ मोहीमेचे उद्घाटन चारुदत्त प्रसादे, विठ्ठल शिंदे यांचे हस्ते झाले.
ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिस लसीकरण करताना हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे, डॉ.शुभांगी नरवडे आदी चे हस्ते लस देण्यात आली.यावेळी ज्ञानेश्र्वर कुऱ्हाडे गोविंद ठाकूर, बाळासाहेब पेटकर यांचेसह बालकांचे माता पिता उपस्थित होते.उत्साहात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झाली.आळंदी ग्रामीण रुग्णालय येथे तसेच शहरातून लसीकरण उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. राहिलेल्या बालकांना उद्या सोमवार पासून (आयपीपीआय अंतर्गत) घरोघरी जाऊन रुग्णालयाच्या टीम लस देणार आहेत.रविशेठ वावरे यांनी पोलिओत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था केली. ६ हजार ८५ बालकांना पोलिओची लस देण्यात आली.