Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : इंडस्ट्रीयल मॅरेथॉनमध्ये धावले तीन हजार नागरिक

PCMC : इंडस्ट्रीयल मॅरेथॉनमध्ये धावले तीन हजार नागरिक

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशन ट्रस्टच्या वतीने मोशीतील पुणे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडस्ट्रियल मॅरेथॉनमध्ये सुमारे तीन हजार नागरिक धावले.
यावेळी इंडस्ट्रियल मॅरेथाॅनमध्ये विजेत्या स्पर्धकांना आयोजक सुभाष जयसिंघानी,अंकाजी पाटील, रवी हिरेमठ,राहुल सप्रे,जगमोहन सिंग यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची निरोगी आरोग्यशैली जपण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती सुभाष जयसिंघानी यांनी यावेळी दिली.


ही स्पर्धा महिला आणि पुरुष २१ किमी,१०किमी आणि ५ किमी या गटात घेण्यात आली.
प्रथम द्वितीय, तृतीय अनुक्रमे विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
२१ किमी ४५ वर्षावरील गटात पुरूष
पांडूरंग पाटील( वेळ १:२६:२०),गौरव…(१:२६:५२), संतू वारडे(१:२७:५६)
प्रसन्नप्रिया रेड्डी( १:४७:५५),डॉ पल्लवी मूग(१:५६:२५), अनिता पाटील( २:००:३३)
२१ किमी ४५ च्या वर्षावरील गटात( विदेशी)
पुरुष मुलू झेनेबे( १:११:३० इथियोपिया),
महिला:- अकाले निगुसे( ३३:५०), मागझे सोफा ( ३९:२६ केनिया)
२१ किमी ४५ वर्षांखालील गटात
प्रल्हाद धनवट( १:१२:२०) राणी मुलचंद( १:२५:२०), निहाल बेग( १:१४:०९),
रोहिणी पाटील(१:२८:२४), पीएच थिप्पेस्वामी(१:५०:३९),
रितू .. .. (१:५२:२६)

१० किमी ४५ वर्षावरील वयोगटात
सुंदर पोळ, (४०:२४), संतोष वाघ(४२:५४), सुरेश चौगुले( ४३:१९)
निकिता गोविलकर( ५२:४२), प्रतिभा नाडकर(५५:२२), प्रीती म्हस्के( १:३:२५)
५ किमी ४५ वर्षे वरील गटात
मुकेश मिस्त्री( १८:५३),
वसंत देसाई( २०:१९), राम लिंभारे( २१:०९)
अंबिका नंदा(२७:३३), नांसि पिंटो( २९:१८)
निशा वाबळे( ३२:५०)

५ किमी ४५ वर्षे खालील गटात

धुळादेव घागरे( १६:०२), यशराज चाकूरे( १६:१६),गणेश आठवले(१६:३०),
वैशाली सावंत(१९:३६),मानसी यादव( २०:१७),
अदिती हरगुडे( २२:०५)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय