मुंबई : आशा गटप्रवर्तक कृती समिती व कामगार कर्मचारी कृति समिती वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. राज्य भरातून आशा गट प्रवर्तक सहभागी होत्या. १२ जानेवारी पासून आशा गटप्रवर्तक संपावर आहेत.
आरोग्य मंत्र्यांनी व प्रधान सचिव यांनी आपल्याला दिवाळी बोनस व मानधन वाढ दोन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्याबाबतचे शासन आदेश, शासन प्रशासनाने न काढलेला नाही त्यामुळे १२ जानेवारी २०२४ पासून बेमुदत संप सुरू आहे. संपाला १५ दिवस झाले तरीही शासन प्रशासन संघटनांच्या प्रतिनिधींनी सोबत चर्चा करत नाही.
तसेच गटप्रवर्तक व आशा संप चालू असतांना मराठा आरक्षणाचा सर्वे करण्यासाठी शासन प्रशासनाकडून दबाव आणून सर्वे केला नाही तर नोटीसा काढू. तसेच कामावरून काढून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत व संप फोडण्याचा प्रयत्न शासन प्रशासनाकडून चालु आहे. त्यामुळे दिनांक २९/१/२०२४ रोजी मागण्या बाबत आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.
आशांना ७ हजार रूपये व गटप्रवर्तक १० हजार रूपये, दिपावली बोनस २ हजार रूपये, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जाबाबत आरोग्य मंत्री यांनी ३ महिन्यापूर्वी संप काळात आश्वासन लेखी दिले. मात्र अद्याप शासन निर्णय काढलेला नाही. आज भव्य आंदोलन करण्यात आले.
राज्याचे आरोग्य उप सचिव लहाने यांना शिष्टमंडळ भेटले, चर्चा केली. त्यांनी सदर मोबदला वाढ प्रस्ताव आरोग्य मंत्री यांनी चर्चा केल्याप्रमणे आशांना ७ हजार गटप्रवर्तकांना १० हजार वाढ व दिपावली बोनस २ हजार रूपये पाठवला आहे. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा बाबत लेखी पत्र केंद्र सरकार कडे पाठविले आहे. राज्य मंत्री मंडळाकडे मोबदला वाढ प्रस्ताव पाठवला आहे. आपले निवेदन व आपल्या संप बाबत माहिती पाठवले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी कॉ. राजू देसले, कॉ. आरमाटी इराणी निलेश दातखिळे, गट प्रवर्तक आरती घुमे उपस्थित होते. तसेच आरोग्य सह संचालक दीप्ती देशमुख, आशा राज्य समन्वयक स्वाती पाटिल यांना ही शिष्टमंडळ भेटले व चर्चा केली. मराठा सर्वेक्षण संप काळात सक्ती करु नये. हे आरोग्यचं काम नाही. बी एल ओ म्हणुन ही सक्ती करु नये, असे आवाहन केले. या संदर्भात पत्र काढले जाईल असे आश्वासन देशमुख, व पाटिल यांनी दिले. संप फोडण्यापेक्षा शासन निर्णय त्वरित काढण्यात यावा, असे आवाहन केले. शिष्टमंडळात शंकर पुजारी, मीना कोळी, सुवर्णा कांबळे, राजेंद्र साठे होते.
मोर्चात आशा गट प्रवर्तक संघटना आयटक राज्य अध्यक्ष व कृति समिती पदाधिकारी कॉ. राजू देसले यांना नाशिक पोलिस निरीक्षक पंचवटी अनिल शिंदे पंत प्रधान नाशिक दौऱ्यात आशा गट प्रवर्तक निवेदन देण्यासाठी वेळ मागीतली असता अटक करून पोलिस कोठडीत बंद करून अमानवीय वागणूक दिली. याचा निषेध करणारा ठराव निलेश दातखिळे यांनी मांडला. सदर पोलिस निरीक्षकावर कठोर कारवाई पोलिस आयुक्त नाशिक यांनी करावी अन्यथा राज्यभरातील आशा गट प्रवर्तक नाशिक येथे येऊन मोर्चा पोलिस आयुक्त नाशिक कार्यालयावर काढतील, असा ठराव संमत करण्यात आला.
मोर्चास कृति समिती चे विवेक मोटेरो, निवृत्त्ती धुमाळ, एम.ए. पाटिल, मिलिंद रानडे, भगवन दवणे आदि आशा गटप्रवर्तकांनी मार्गदर्शन केले. राज्यातील कामगार कर्मचारी कृति समिती आशा गट प्रवर्तक सोबत आहे त्वरीत शासन निर्णय काढा अन्यथा जिल्हा जिल्हयात रस्त्यांवर उतरून पाठिंबा देऊ असे कामगार कर्मचारी कृती समिती च्या पदाधिकारी यांनी इशारा दिला. आंदोलन चा समारोप राजू देसले यांनी केला. बुधवारी मंत्री मंडळ बैठकीत आशा गटप्रवर्तकांना मोबदला वाढ निर्णय जाहिर करून शासन निर्णय काढावा. अन्यथा कृती समिती तीव्र आंदोलन राज्यव्यापी करेल असा इशारा दिला. संप मागण्या मान्य होई पर्यंत सुरूच राहील असा निर्णय घेण्यात आला.