Friday, May 17, 2024
HomeनोकरीRaj Thakare:मराठी तरुणांनी जागरूक राहावे, रेल्वे लोको पायलट भरती 5696 जागा-मनसेचा आदेश?

Raj Thakare:मराठी तरुणांनी जागरूक राहावे, रेल्वे लोको पायलट भरती 5696 जागा-मनसेचा आदेश?

रेल्वेमध्ये लोको पायलट या पदाच्या भरतीसाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली असून ती राज यांनी पोस्ट केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असे म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर याचा रितसर तपशील लावावा. सदर विषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांनी नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.
सदरची जाहिरात सर्व प्रसारमध्यमात आली आहे.
राज ठाकरे यांनी यांचे ‘एक्स’ समाज माध्यमावर आवाहन प्रसिद्ध झाले आहे.


तसेच काही ऑनलाईन न्युज पोर्टलनी ही जाहिरात नोकरी न्यूजच्या वार्तांकनात प्रसिध्द केली आहे.
अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांनी नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय