Monday, July 1, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

Om Birla : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला (Om Birla) यांची निवड झाली आहे. आवाजी मतदानाने त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव पीएम मोदींनी सभागृहात मांडला. राजनाथ सिंह, लालन सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या जागेवर गेले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केले. हा ऐतिहासिक क्षण होता.

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पीएम मोदी म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की तुम्ही (ओम बिर्ला) आगामी पाच वर्षे आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत राहाल. 

कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करताना सांगितले की, तुम्ही ज्या पदावर आहात त्याच्याशी अनेक गौरवशाली परंपरा निगडीत आहेत. मला आशा आहे की तो भेदभाव न करता पुढे जाशाल.

ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारकडे राजकीय ताकद आहे, पण विरोधक देशाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळीही विरोधक देशाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते म्हणाले, “विरोधकांना सभागृहात जनतेचा आवाज बुलंद करण्याची मुभा देणे महत्त्वाचे आहे. आमचा आणि जनतेचा आवाज बुलंद करण्याची तुम्ही आम्हाला संधी द्याल, असा मला विश्वास आहे.”

विरोधी आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला, त्याला आरएसपी नेते एनके प्रेमचंद्रन यांनी पाठिंबा दिला. इतर अनेक विरोधी पक्षनेतेही के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला आणि अनेक खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. सभागृहाचे प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली. विरोधी पक्षांकडून मतांचे विभाजन करण्याची मागणी नव्हती, त्यानंतर आवाजी मतदानाने बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे

मुख्यमंत्र्यांच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजन दरम्यान मोठी दुर्घटना टळली

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय