कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या घरात ईडीला घबाड सापडलं आहे. आमिर खानच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पाच बॅग्समध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. ईडीने व्यावसायिक आमिर खानच्या (Aamir Khan) गार्डन रीच येथील निवासस्थानी छापेमारी करत रोकड जप्त केली. शनिवारी सकाळी ही छापेमारी करण्यात आली. शनिवारी सकाळी सुरु झालेल्या छापेमारी शनिवारी रात्रीपर्यंत सुरु होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पैशांची मोजणी सुरु होती.
कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या निवासस्थानी ईडीला 10 बॅग्स सापडल्या. यामधील पाच बॅगांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा भरलेल्या होत्या. याशिवाय 200 रुपयांच्या नोटाही भरून ठेवण्यात आल्या होत्या. ईडीने आर्थिक गैरव्यवहार कायदा 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई केली आहे. फेडरल बँकेकडून (Federal Bank) मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. याअंतर्गत 15 फेब्रुवारी रोजी कोलकाता पार्क स्ट्रिट पोलीस स्टेशनमध्ये (Park Street Police Station) पहिला एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता.