Wednesday, May 22, 2024
HomeNewsतुर्कीमध्ये भूकंप 195 ठार सीरिया,इस्राईल हादरले

तुर्कीमध्ये भूकंप 195 ठार सीरिया,इस्राईल हादरले

अंकारा:तुर्कीमध्ये आज पहाटे 4 वा झालेल्या 7.8 रिष्टर स्केलच्या भूकंपामुळे 195 ठार व 516 नागरिक जखमी झाले आहेत.बहुसंख्य जखमी आणि मृत हे सीरिया,तुर्कीमधील आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे 24 किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला. 11 मिनिटांनंतर 6.7 रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 9.9 किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर 19 मिनिटांनी 5.6 रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला.

सीरिया,तुर्की मध्ये मोठी हानी झाली आहे.शेकडो इमारती उध्वस्त झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.या भूकंपाची झळ इस्राईल,लॅबोनॉन या देशांना बसली आहे. उत्तर सीरियातल्या अलेप्पो आणि हमा या शहरांमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती कोसलळल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय