Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणDYFI च्या वतीने वाढत्या बेरोजगारी विरोधात 'बेरोजगार नोंदणी अभियान'

DYFI च्या वतीने वाढत्या बेरोजगारी विरोधात ‘बेरोजगार नोंदणी अभियान’

जालना : वाढत्या बेरोजगारी विरोधात ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’च्या वतीने बदनापूर येथे  ‘बेरोजगार नोंदणी अभियान’ सुरू करण्यात आले.

नोकर भरती वरील बंदी उठवा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बेरोजगार कक्ष तत्काळ स्थापन करा, बेरोजगाराना नोकरी मिळे पर्यंत ५,००० रुपये बेरोजगार भत्ता द्या, कंत्राटी कामगार भरती बंद करा, आदी मागण्यांना घेऊन हे अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुण युवकांंनी DYFI जालना फेसबुक पेजवर किवा 7769037229 या व्हाट्सएप नंबर वर आपली बेरोजगार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी अनिल गायकवाड, गौरव चव्हाण, बाबासाहेब पाटोळे, शारुख शेख, अरुण कनसे, सुमित साबळे उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय