पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेल च्या वतीने दि.6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपळे गुरव गजिबो हॉटेल समोरील म्हसोबा चौकात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेल शहराध्यक्ष विष्णु शेळके यांनी बाबासाहेबांनी आदिवासी समाजासाठी संविधानात केलेल्या तरतुदींचे विश्लेषण करीत आदिवासींसाठी संविधानातील असलेल्या तरतुदींमुळे आदिवासींचे आरक्षण, आणि आदिवासी रूढी परंपरा संस्कृती आजही टिकून असून जल जंगल जमिनीचे स्वामित्व अबाधित राहण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
यावेळी माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल चे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या आभिवादनात गोरक्ष लोखंडे यांनी बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडताना त्यांनी दिन दलित दुबळ्या दलित आदिवासींसाठी संपूर्ण आयुष्य वेचीत निर्माण केलेल्या संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता हि तत्व देत असताना जगात सर्वात मोठ्या लोकशाही प्रणालीचा पाया संविधनिक चौकटीत किती भक्कम आणि अभेद्य केला यांची मांडणी प्रभावी शब्दांत केली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष शाम जगताप, सामजिक कार्यकर्ते रोहित जाधव, अनुसूचित जमाती सेल शहर कार्याध्यक्ष राजेंद्र रेंगडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष दिलिप लोखंडे, सतिश काशिद, मनोज काशिद, यश लोहार, अभिजित पवार, तुषार गायकवाड, स्वस्तिक यादव, सिद्धांत शेळके, निरज खरात अक्षय पारखे, अवधूत पवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसहयाद्री ढोल ताशा पथक, आदिवासी समन्वय समिति यांनी मोलाचे सहकार्य केले.