Friday, April 26, 2024
HomeNews''बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?' मा. अजितदादा पवार पत्रकारावर भडकले

”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?’ मा. अजितदादा पवार पत्रकारावर भडकले

श्रीगोंदा: श्रीगोंदामध्ये आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्या नंतर पत्रकांरानी विचारलेले प्रश्नांवर बोलताना म्हणाले ”अमुक अमुक बारामतीला येणार आहेत, तुम्हचे काय म्हणनं येऊदे ना बारामतीला बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का ? ती सर्वाची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्टात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले. म्हणुन पत्रकारांना माझी हात जोडुन विनंती आहे तुम्हाला काही दाखवायला नसेल तर असले काही दाखवू नका” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय