Sunday, December 8, 2024
Homeक्रीडाविश्वआज पुन्हा रंगणार भारत पाकिस्तानचा महामुकाबला, असा पाहता येणार सामना

आज पुन्हा रंगणार भारत पाकिस्तानचा महामुकाबला, असा पाहता येणार सामना

मुंबई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये दुसऱ्यांदा महामुकाबला होणार आहे. सुपर 4 (Super 4 Round) राउंडमधील हा सामना असणार आहे.

साखळी फेरीतील सामना 27 ऑगस्टला झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता. यानंतर आज सायंकाळी दुसऱ्यांदा भारत पाकिस्तान मध्ये सामना रंगणार आहे. दुबईच्या स्टेडियम मध्ये ही मॅच होणार आहे. या सामन्याकडे फायनल आधीची रंगीत तालिम म्हणूनही पाहिलं जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ ग्रुप ए मध्ये होते. भारत पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहिला.

भारतासाठी पहिला सामना जिंकणं सोपं नव्हतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी भारतासमोर विजयासाठी 148 धावांच लक्ष्य ठेवलं. तर टीम इंडियाने पाच विकेटने विजय मिळवला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्याने विजयात मोलाचं योगदान दिलं.

भारत आणि पाकिस्तान मध्ये खेळला जाणारा आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवून 7.30 वाजता सुरु होईल. भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. 

संबंधित लेख

लोकप्रिय