Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील गुणवंत शिक्षक आणि समाजाला प्रेरणा देणारे गुणीजण अशा १३ जणांना शिक्षक दिनानिमित्त कामगार कल्याण केंदे, उद्योगनगर, चिंचवड येथे आदर्श शिक्षक व संस्काररत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

वितरणाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.रजनी शेठ, जेष्ठ साहित्यिक व कवी राज अहेरराव, मराठी अभिनेत्री प्रज्ञा पाटील, जनसंपर्क अधिकारी अहमदनगरचे बाबासाहेब मेमाणे, नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव ता. बार्शी जि सोलापूर संस्थेचे सचिव हेमंत गडसिंग, यांच्या हस्ते वितरण झाले. या निमित्ताने प्रमुख पाहुण्या रजनी शेठ म्हणाल्या, शिक्षकांनी आपला आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा आसे ज्ञानदानाचे काम करावे आपले अनुकरण विद्यार्थ्यांनी करावे संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत. एकूण १३ जणांना पुरस्कार देण्यात आले.

पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे :

१. प्रा संपतराव गर्जे भारतिय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संततुकारामनगर पुणे – संस्काररत्न पुरस्कार.

२. अनघा नितीन दिक्षीत नुतन विद्या मंदिर कृष्णानगर पुणे – आदर्श शिक्षिका पुरस्कार

३. लता आण्णा नवले औटी सरस्वती विद्या मंदिर आकुर्डी पुणे

४. योगिता कोठेकर शिवभुमी विद्यालय यमुनानगर पुणे – आदर्श शिक्षिका पुरस्कार

५. संगिता शांताराम लांडगे जि.प. प्रा. शाळा नांदुरी दुमाला ता. संगमनेर जि. अहमदनगर -आदर्श शिक्षिका पुरस्कार

६. दिपाली काशिनाथ रेपाळ जि.प. प्रा. शाळा गोडेवाडी ता‌. संगमनेर जि. अहमदनगर – आदर्श शिक्षिका पुरस्कार

७. कविता अरुण वाल्हे श्री गुरुमैया प्रभाकंवरजी प्राथमिक विद्या मंदिर चिंचवड पुणे – आदर्श शिक्षिका पुरस्कार

८. गणपत बाळासाहेब शिंदे संगमनेर जि. अहमदनगर – कृषीरत्न पुरस्कार

९. रविंद्र गुंजाळ संगमनेर जि. अहमदनगर – समाजरत्न पुरस्कार

१०. कारभारी फापाळे संगमनेर जि. अहमदनगर – समाजरत्न पुरस्कार

११. सुषमा क्षत्रिय संगमनेर जि. अहमदनगर – समाजरत्न पुरस्कार

१२. नमिता विलास नरसाळे अहमदनगर – क्रिडारत्न पुरस्कार

१३. पुजा राजेंद्र दिक्षीत संगमनेर जि‌. अहमदनगर – संस्काररत्न पुरस्कार.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड केले, सुत्रसंचलन उपाध्यक्षा नम्रता बांदल यांनी केले तर आभार उपाध्यक्ष शब्बीर मुजावर यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय