Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनाआदिवासी बांधवांना किराणाचे वाटप

आदिवासी बांधवांना किराणाचे वाटप


कान्हेवाडी ( ता . खेड ) :
 औंध येथील पर्यावरण शिक्षण केंद्राच्यावतीने राजगुरुनगर व कान्हेवाडी येथील घरकामगार व आदिवासी ठाकर समाजातील शंभर कुटुंबांना घरपोच किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले . 

किट वाटपाचे स्थानिक संयोजन आदिम संस्थेने केले होते . यावेळी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे , पर्यावरण शिक्षण केंद्राच्या संस्कृती मेमन , आदिम संस्थेचे डॉ . हनुमंत भवारी , सामाजिक कार्यकर्ते महेंद्र थोरात , अमोद गरुड , झरिना शेख , मुमताज शेख , माजी सरपंच साळूबाई केवाळे , शिवाजी पारधी , मनिषा थोरात , ज्ञानेश्वर कोबल यांनी समन्वयाचे काम करून गरजूंना घरपोच किराणा दिला.

संबंधित लेख

लोकप्रिय