Saturday, April 27, 2024
Homeजिल्हामनसे तर्फे मोफत शालेय गणवेश व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

मनसे तर्फे मोफत शालेय गणवेश व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 12 मध्ये गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. व इतर शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या. तसेच नुकत्याच झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्याना मनसे पदाधिकाऱ्यांचा हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मनसे उपशहर अध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांनी केले.

‘हर घर तिरंगा’ या अभियानाला प्रोत्साहित करत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दक्षिण रत्नागिरी मनसे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, मनसे रत्नागिरी शहरअध्यक्ष सतीश राणे, मनविसे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, मनसे रत्नागिरी उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, मनसे उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, उपशहरअध्यक्ष सिद्धेश धुळप, उपशहर अध्यक्ष जितेंद्र जाधव, मनसे विभाग अध्यक्ष अजिंक्य केसरकर, विभागअध्यक्ष अक्षय माईन, मुख्याध्यापिका भाग्यश्री भालचंद्र साळवी, उपशिक्षक विजय आत्माराम पंडित आणि समस्त विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय