Saturday, April 27, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

पिंपरी चिंचवड : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

पिंपरी : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वेव्ह ऑफ होप या कार्यक्रमांतर्गत पिंपरी येथे 450 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

गरीब, निराधार, विधवा, परितक्त्या हे समाजातील दुर्बल घटक आहेत. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावले आहे. समाजातील दुर्बल घटकांचे उत्पन्न कमी झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा लोकांच्या घरातील चूल बंद राहु नये, या मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांना आम्ही मदत करत आहोत, असे गिरीश बिदानी यांनी सांगितले.

ब्रेकींग : राज्यातल्या शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची प्रस्तावास मान्यता

 

विप्ला फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी श्रीमती हवोवी वाडीया म्हणाल्या की, महामारीचा काळ अतिशय बिकट आहे,हे संकट लवकर दूर होईल. गोर गरीब जनतेला किमान समृद्ध करण्यासाठी सेवाभावनेतून आपण सर्वांनी उपेक्षितांच्या भुकेचा प्रश्न सोडवू. हे आपले ईश्वरी कार्य आहे. कठीण काळात उपेक्षिता ना दिलासा दिला पाहिजे, हे सर्वांचे कर्तव्य आहे.        

 

शहरातील अंध, अपंग, मूकबधिर, घरेलू महिला कामगार आणि स्किल डेव्हलपमेंटच्या विद्यर्थिनींना दोन महिने पुरेल इतके किराणा किटचे वितरण करण्यात आले.

 

विप्ला फाउंडेशन, एचएसबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील हॉटेल अल्पाईन यांच्या सौजन्याने शहरातील 450 गरजूंना किराणा वितरित करण्यात आले.

हेही वाचा ! पुणे : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू, डॉक्टरांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी

 

एचएसबीसी च्या दामिनी खैरे, फाउंडेशनचे प्रमुख जैद कापडी, पदाधिकारी प्रवीण जाधव, विनोद भालेराव सह गायत्री दीक्षित, विश्वनाथ बी. व्ही. सुमित सोनावळे यांचे हस्ते किराणा वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संयोजन प्रा.दिपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड यांनी केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय