Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणसिटूच्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा संप, भोकरदन व जाफराबाद THO कार्यालयासमोर आंदोलन

सिटूच्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा संप, भोकरदन व जाफराबाद THO कार्यालयासमोर आंदोलन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मागण्या मान्य न झाल्यास सत्याग्रह आंदोलनाचा इशारा – कॉ . गोविंद आर्दड

जालना : योजना कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, व शालेय पोषण आहार कर्मचारी या योजना कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाला सिटूचे जिल्हा सचिव कॉ. गोविंद आर्दड यांनी मार्गदर्शन केले. 

आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, व CDPO यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

ब्रेकींग : राज्यातल्या शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची प्रस्तावास मान्यता

योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून वेतन श्रेणी लागू करावी. किमान वेतन २१००० रुपये लागू करा. यासह तालुका व जिल्हास्तरीय मागण्यांचे निवेदने देण्यात आली. व मागण्या मान्य न झाल्यास सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 

यावेळी कॉ. गोविंद आर्दड, सुभाष मोहिते, सुजाता छडीदार, रेखा सपकाळ, राहिताई वाघ, सुधाकर छडीदार, साकृबा बोडखे, कांताबाई लगड, दुर्गाबाई लहाने, शेख अहेमद, संजीवनी भक्कड, प्रभाकर चोरमारे यासह आशा व गटप्रवर्तक, अंगनवाडी कारभारी, शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी होऊन आंदोलन स्थळी उपस्थित होते.

हेही वाचा ! सोयाबीनचे दर कोसळले याला जबाबदार कोण ? पहा शेतकरी नेते अजित नवले काय म्हणाले !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय