Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणडिंभे येथील ठाकर वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

डिंभे येथील ठाकर वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

डिंभे (घोडेगाव) : नुकतेच शहीद बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत, सियारा इनेशिटीव्ह संस्था, पुणे यांच्या सहकार्याने, शिनोली गावाच्या काळबांध व ठाकरवाडी या दोन दुर्गम ठाकरवाडयांमध्ये सुमारे ३५ कुटुंबाना किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.

या किट वाटपाचे स्थानिक संयोजन आदीम संस्थेने केले होते. ठाकर हा अदिवासी समाज मुख्यतः भूमिहीन व शेतमजुरी करणारा समाज आहे। लॉकडाऊन नंतर शेतमजुरीची ही कामे कमी झाल्याने या समाजाच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही किराणा वाटपाची छोटीशी का होईना मदत सद्यस्थितीत गरजेची होती. किराणा किट मध्ये, तेल, डाळ, गूळ, कडधान्ये, मसाले, मीठ असे साहित्य देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजु घोडे, अशोक पेकारी, अविनाश गवारी व धनेश पारधी हे उपस्थित होते. या किराणा माल वाटपाचे स्थानिक पातळीवर नियोजन सचिन मधे व आरती मधे यांनी केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय