Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचेशी कामगार प्रश्नांवर चर्चा

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचेशी कामगार प्रश्नांवर चर्चा

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्याच्या “विरोधी पक्षनेते” पदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे सह कष्टकरी कामगारांनी विधान भवन मुंबई येथे भेट घेऊन कामगार अहवाल देऊन कामगार प्रश्नी चर्चा केली .

याप्रसंगी इरफान चौधरी, मुंबईचे दिनेश कदम, मनोज यादव, देवीलाल आहेर, फरीद शेख, ओमप्रकाश मोरया उपस्थित होते.पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात व राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यात परखड व स्पष्टवक्ते असणारे दादांचा सिहांचा वाटा आहे हि जबाबदारी समर्थपणे सांभाळून सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या काम थांबवुन योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करतील याचा विश्वास आहे.

याप्रसंगी मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या मेळाव्यास वेळ मिळणे बाबत चर्चा केली. असंघटित कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्नावर नखाते यांनी तयार केलेला कार्यअहवाल सादर करण्यात आला.

  • क्रांतिकुमार कडुलकर
Advertisement
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय