Friday, April 19, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार होती. अखेर आज राऊत यांच्या नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळपासून संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं होतं. तसेच त्यांची कसून चौकशी सुरू होती. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या दरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. अखेर नऊ तासांनंतर राऊत यांना ईडीने अटक केली. यावेळी संजय राऊत यांनी भगव मफलर फडकवत मी लढतच असा इशारा दिला.

दरम्यान, संजय राऊत यांनी “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

या सोबतच “आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र” असेही अटकेनंतर ट्वीट केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय